Posts

  कसला काळ आहे हा...   तिथे कुठेतरी झाडांच्या गर्दीच्या मधल्या जागेत टेकडीच्या चढणीवर गवत वाढत जातं. आणि तो जुना क्रांतीपथ सावल्यांत विस्कळित होतो एक जुनं घर आहे, जिथं बैठका होत असत- त्यात भाग घेणारांची शिकार होऊ लागताच सोडून दिलं ते त्यांनी आणि या सावल्यांत विरून गेले.   मी तिथून चालत गेले होते कधीतरी भीतीच्या काठाकाठाने -अळंबी वेचायला, पण फसू नका. ही काही रशियन कविता नाही, दुसऱ्या कुठल्या देशातली नाही, इथलीच आहे. आपला देशही सरकतोय स्वतःच्या सत्यस्वरुपाकडे, आणि भीतीच्या दिशेनेही. लोक नाहीसे करून टाकण्याचे आपल्या देशाचे स्वतःचे मार्गही आहेत.   मी नाही सांगणार तुम्हाला ती जागा कुठे आहे, जंगलाच्या अंधाऱ्या जाळीत. एक प्रकाशाचा पट्टा तिथे थबकतो- सहज कळणार नाही. दोन वाटांच्या दुबेळक्यात भुतांचा वावर असावा, कुजल्या पानांवरच्या बुरशीचा स्वर्गहीः मला माहीत आहे तो पट्टा कुणीतरी विकत घ्यायच्या तयारीत आहे, विकायच्या तयारीत आहे, आणि मग नाहीसा करून टाकण्याच्याही.   नाही सांगणार तुम्हाला मी ती जागा कुठची ते, मग एवढं तरी कशासाठी सांगायचं ? कारण... तुम

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.

'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात डब्लू एच ऑडनच्या चार कवितांवर शैलेन भांडारेंचा फार साक्षेपी लेख आहे. बरेच दिवस ऑडनच्या कवितांना मराठी भाषेच्या कवेत घ्यायचे होते. या लेखामुळे ती इच्छा ताजी झाली.  त्या  लेखाची लिंक- http://aisiakshare.com/node/6252 आणि या त्यातील चार कविता- १- सप्टेंबर १, १९३९ मी बसलोय इथे एका यारबारमध्ये बावन्नाव्व्या रस्त्यावर डळमळीत आणि भेदरलेला गेल्या दशकभराच्या नीच अप्रामाणिकपणाच्या हुशाऱ्या मारणाऱ्या आशा... मावळल्यात साऱ्या भय आणि संतापाच्या लाटांवर लाटा फेर धरतात पृथ्वीच्या पाठीवर तेजाळल्या, अंधारल्या साऱ्याच प्रदेशांवर आमच्या जगण्याचा जणू ताबा घेतात ; नकोनकोसा मरणगंध सप्टेंबरच्या रात्रींवर आक्रमण करतो. कुणीतरी नीट अभ्यास केला तर हे सारे गाडलेले अपकृत्य येईल पृष्ठावर. ल्यूथरने सांगितल्यापासून आतापर्यंतचे सारेच... साऱ्या संस्कृतीचा तोल ढळवणारे शोधा, लिंझला काय झालं कुठल्या विक्राळ कोषमुक्त किड्याने घडवला एक भयंकर मनोविकृत देव ? मला आणि लोकांना तेवढंच कळतं जे सगळीच शाळकरी पोरं शिकतात ज्यांना दुष्टता भोगावी ल