कसला काळ आहे हा... तिथे कुठेतरी झाडांच्या गर्दीच्या मधल्या जागेत टेकडीच्या चढणीवर गवत वाढत जातं. आणि तो जुना क्रांतीपथ सावल्यांत विस्कळित होतो एक जुनं घर आहे, जिथं बैठका होत असत- त्यात भाग घेणारांची शिकार होऊ लागताच सोडून दिलं ते त्यांनी आणि या सावल्यांत विरून गेले. मी तिथून चालत गेले होते कधीतरी भीतीच्या काठाकाठाने -अळंबी वेचायला, पण फसू नका. ही काही रशियन कविता नाही, दुसऱ्या कुठल्या देशातली नाही, इथलीच आहे. आपला देशही सरकतोय स्वतःच्या सत्यस्वरुपाकडे, आणि भीतीच्या दिशेनेही. लोक नाहीसे करून टाकण्याचे आपल्या देशाचे स्वतःचे मार्गही आहेत. मी नाही सांगणार तुम्हाला ती जागा कुठे आहे, जंगलाच्या अंधाऱ्या जाळीत. एक प्रकाशाचा पट्टा तिथे थबकतो- सहज कळणार नाही. दोन वाटांच्या दुबेळक्यात भुतांचा वावर असावा, कुजल्या पानांवरच्या बुरशीचा स्वर्गहीः मला माहीत आहे तो पट्टा कुणीतरी विकत घ्यायच्या तयारीत आहे, विकायच्या तयारीत आहे, आणि मग नाहीसा करून टाकण्याच्याही. नाही सांगणार तुम्हाला मी ती जागा कुठची ते, मग एवढं तरी कशासाठी ...
Posts
Showing posts from July, 2022