डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.
'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात डब्लू एच ऑडनच्या चार कवितांवर शैलेन भांडारेंचा फार साक्षेपी लेख आहे. बरेच दिवस ऑडनच्या कवितांना मराठी भाषेच्या कवेत घ्यायचे होते. या लेखामुळे ती इच्छा ताजी झाली. त्या लेखाची लिंक- http://aisiakshare.com/node/6252 आणि या त्यातील चार कविता- १- सप्टेंबर १, १९३९ मी बसलोय इथे एका यारबारमध्ये बावन्नाव्व्या रस्त्यावर डळमळीत आणि भेदरलेला गेल्या दशकभराच्या नीच अप्रामाणिकपणाच्या हुशाऱ्या मारणाऱ्या आशा... मावळल्यात साऱ्या भय आणि संतापाच्या लाटांवर लाटा फेर धरतात पृथ्वीच्या पाठीवर तेजाळल्या, अंधारल्या साऱ्याच प्रदेशांवर आमच्या जगण्याचा जणू ताबा घेतात ; नकोनकोसा मरणगंध सप्टेंबरच्या रात्रींवर आक्रमण करतो. कुणीतरी नीट अभ्यास केला तर हे सारे गाडलेले अपकृत्य येईल पृष्ठावर. ल्यूथरने सांगितल्यापासून आतापर्यंतचे सारेच... साऱ्या संस्कृतीचा तोल ढळवणारे शोधा, लिंझला काय झालं कुठल्या विक्राळ कोषमुक्त किड्याने घडवला एक भयंकर मनोविकृत देव ? मला आणि लोकांना तेवढंच कळतं जे सगळीच शाळकरी पोरं शिकतात ज्यांना दुष्टता भोगावी ...