डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.
'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात डब्लू एच ऑडनच्या चार कवितांवर शैलेन भांडारेंचा फार साक्षेपी लेख आहे. बरेच दिवस ऑडनच्या कवितांना मराठी भाषेच्या कवेत घ्यायचे होते. या लेखामुळे ती इच्छा ताजी झाली. त्या लेखाची लिंक-
http://aisiakshare.com/node/6252
आणि या त्यातील चार कविता-
गावातल्या चर्चच्या अंगणात ते जुनं युचं झाड आहे
मी त्या समितीसमोर गेलो तेव्हा, त्यांनी मला बसायला खुर्ची दिली;
४-काळ काहीच म्हणणार नाही
काळ काहीच म्हणणार नाही पण म्हणेल, मी म्हणालेलो तुला,
http://aisiakshare.com/node/6252
आणि या त्यातील चार कविता-
१- सप्टेंबर १, १९३९
मी बसलोय इथे एका यारबारमध्ये
बावन्नाव्व्या रस्त्यावर
डळमळीत आणि भेदरलेला
गेल्या दशकभराच्या नीच अप्रामाणिकपणाच्या
हुशाऱ्या मारणाऱ्या आशा... मावळल्यात साऱ्या
भय आणि संतापाच्या लाटांवर लाटा
फेर धरतात पृथ्वीच्या पाठीवर
तेजाळल्या, अंधारल्या साऱ्याच प्रदेशांवर
आमच्या जगण्याचा जणू ताबा घेतात;
नकोनकोसा मरणगंध
सप्टेंबरच्या रात्रींवर आक्रमण करतो.
कुणीतरी नीट अभ्यास केला तर
हे सारे गाडलेले अपकृत्य येईल पृष्ठावर.
ल्यूथरने सांगितल्यापासून आतापर्यंतचे सारेच...
साऱ्या संस्कृतीचा तोल ढळवणारे
शोधा, लिंझला काय झालं
कुठल्या विक्राळ कोषमुक्त किड्याने
घडवला एक भयंकर मनोविकृत देव?
मला आणि लोकांना तेवढंच कळतं
जे सगळीच शाळकरी पोरं शिकतात
ज्यांना दुष्टता भोगावी लागते
ते दुष्टतेनेच फेड करतात
देशोधडीला लावलेल्या थुसिडायडेसला ठाऊक होते
लोकशाहीबद्दलचे सारे वाद आणि शब्दशब्द…
आणि हुकूमशहा काय करतात तेही...
अवसादी बुद्धीदौर्बल्याची शिकार झालेला
थेरडा जणू बोलत रहावा तसा बोलत राहिला तो...
त्याने सारे विश्लेषण मांडले आपल्या पुस्तकात.
तरी सारे प्रबोधन गेले वाहून
सवयीच्या दुःखांचीच सवय पडली
सारा गोंधळ आणि व्याकुळ व्यथा...
आता सारे काही पुन्हा पुन्हा सहायचे आहे.
या तटस्थ उदासीन वातावरणात
आंधळ्या गगनचुंबी इमारती मिरवून घेतात
स्वतःची जबरदस्त उंची आणि घोषित करतात
समूहात जगणाऱ्या माणसाची ताकद,
हरेक भाषेतून ओतली जाते
स्पर्धेची कुठलीही सबब:
पण एवढा वेळ आहे कुणाजवळ...
जगायला वेडसर आनंदाच्या स्वप्नांत.
आरशातूनही डोकावताना दिसतो...
चेहरा साम्राज्यवादाचा
आणि आंतरराष्ट्रीय दुष्कृत्येही
या बारमधले चेहरे घट्ट
चिपकून रहातात त्यांच्या सर्वसाधारण दिवसाला.
दिवे कधी विझता नयेत
संगीत सुरू राहिलंच पाहिजे.
साऱ्या रूढ कल्पना जणू कट शिजवतात
हा कडेकोट किल्ला
घरगुती वाटावा म्हणून...
नाहीतर चुकून कळून चुकेल आम्हाला
आमचा खरा ठावठिकाणा,
भुताळी जंगलात हरवलेली
रात्रीला भ्यालेली मुले जणू...
कधी आनंदही नाही पाहिलेला आम्ही, ना काही भले.
लष्करातला अगदी भुस्कट कचरा,
आणि अधिकारीही जे ओरडतात
ते आपल्या इच्छांइतकंही रासवट नसतं.
त्या वेड्या निजिन्स्कीने
जे लिहिलं डियाघिलेवबद्दल
ते खरंय अगदी सामान्य मनासाठीही.
प्रत्येक स्त्रीच्या आणि पुरुषाच्या
हाडांतच एकजीव गुंफलेली त्रुटी आहे ती...
जे अप्राप्य आहे तेच हवंस वाटण्याची
नको असतं वैश्विक प्रेम कुणासही
फक्त माझ्यावर प्रेम करावं कुणीतरी... बस्स.
आणि मग त्या साचलेल्या काळिम्यातून
नैतिकतेच्या जगण्यात प्रवेश करते
प्रवाशांची गर्दी
सकाळच्या ठरीव प्रार्थना घोळवत;
“मी पत्नीशी एकनिष्ठ राहीन,
मी माझ्या कामाशी कर्तव्यनिष्ठ राहीन,”
आणि मग असाहाय्यसे शास्ते होतात जागे
खेळू लागतात नेहमीचा सक्तीचा खेळ:
त्यांना आता कोण सुटका देईल,
कोण बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचेल,
मुक्यांचे म्हणणे कोण मांडेल?
माझ्याकडे फक्त आवाज आहे
असत्याची घडी विसकटून टाकण्यासाठी
मेंदूत घट्ट बसलेले रोमांचक असत्य.
रस्त्यातल्या चिकण्याची किंवा
अधिकारी प्रस्थापितांचीही- असत्ये...
त्यांच्या इमारती अस्मानाला भिडलेल्या असतात:
राज्यसत्ता नावाचं काही नसतंच...
आणि एकट्याने कुणीही अस्तित्वात राहू शकत नाही.
भुकेपुढे पर्याय नसतो हो...
नागरिक असो वा पोलीस;
एकमेकांवर प्रेम करा वा मरा.
रात्रीच्या अंधारात असहाय्य असे
आमचे जग स्तब्धसुन्न पडून रहाते;
सभोवार असतात काही ठिपके
टोचऱ्या बोचऱ्या प्रकाशाचे
जिथूनजिथून न्यायबुद्धी देते हाक
तिथूनतिथून लखलखणारे
असेन का मी सुद्धा, तसाच घडलेला?
कामनांनी आणि धुळीनेही...
ग्रस्तत्रस्त जरी निराशेने, नकारात्मतेनेही…
तरीही उजळावी तशीच एक लख्ख हुंकारणारी ज्योत
September 1, 1939
I sit in one of the dives
On Fifty-second Street
Uncertain and afraid
As the clever hopes expire
Of a low dishonest decade:
Waves of anger and fear
Circulate over the bright
And darkened lands of the earth,
Obsessing our private lives;
The unmentionable odour of death
Offends the September night.
Accurate scholarship can
Unearth the whole offence
From Luther until now
That has driven a culture mad,
Find what occurred at Linz,
What huge imago made
A psychopathic god:
I and the public know
What all schoolchildren learn,
Those to whom evil is done
Do evil in return.
Exiled Thucydides knew
All that a speech can say
About Democracy,
And what dictators do,
The elderly rubbish they talk
To an apathetic grave;
Analysed all in his book,
The enlightenment driven away,
The habit-forming pain,
Mismanagement and grief:
We must suffer them all again.
Into this neutral air
Where blind skyscrapers use
Their full height to proclaim
The strength of Collective Man,
Each language pours its vain
Competitive excuse:
But who can live for long
In an euphoric dream;
Out of the mirror they stare,
Imperialism’s face
And the international wrong.
Faces along the bar
Cling to their average day:
The lights must never go out,
The music must always play,
All the conventions conspire
To make this fort assume
The furniture of home;
Lest we should see where we are,
Lost in a haunted wood,
Children afraid of the night
Who have never been happy or good.
The windiest militant trash
Important Persons shout
Is not so crude as our wish:
What mad Nijinsky wrote
About Diaghilev
Is true of the normal heart;
For the error bred in the bone
Of each woman and each man
Craves what it cannot have,
Not universal love
But to be loved alone.
From the conservative dark
Into the ethical life
The dense commuters come,
Repeating their morning vow;
“I will be true to the wife,
I’ll concentrate more on my work,"
And helpless governors wake
To resume their compulsory game:
Who can release them now,
Who can reach the deaf,
Who can speak for the dumb?
All I have is a voice
To undo the folded lie,
The romantic lie in the brain
Of the sensual man-in-the-street
And the lie of Authority
Whose buildings grope the sky:
There is no such thing as the State
And no one exists alone;
Hunger allows no choice
To the citizen or the police;
We must love one another or die.
Defenseless under the night
Our world in stupor lies;
Yet, dotted everywhere,
Ironic points of light
Flash out wherever the Just
Exchange their messages:
May I, composed like them
Of Eros and of dust,
Beleaguered by the same
Negation and despair,
Show an affirming flame.
*********************
२- ए, कसला आहे तो आवाज?
ए, कसला आहे तो आवाज कानांत थरारणारा
खालच्या दरीतून येणारे ढोलक ढोल?
काही विशेष नाही, लाल शिपाई येत आहेत, प्रिये,
शिपाई येत आहेत.
ए कसला तो प्रकाश लखलखतोय लख्ख
किती दूरवरून दिसतेय झळाळ-झळाळी?
काही विशेष नाही, त्यांच्या शस्त्रांवर ऊन
चमकतंय, प्रिये,
ते सावकाश येत आहेत.
ए काय करीत आहेत ते एवढी सगळी शस्त्रं अंगावर
लेऊन
काय चाललंय एवढ्या सकाळ-सकाळी?
काही नाही विशेष, नेहमीचा सराव, प्रिये,
कदाचित् इशारा देत असतील.
ए त्यांनी अचानक रस्ता का बदलला
का अचानक वळलेत ते?
कुणीतरी काही वेगळी आज्ञा सोडली असेल, प्रिये,
तू का गुडघे टेकते आहेस?
की ते डॉक्टरी उपचारांसाठी थांबलेत…
घोडे आवरलेत पहा त्यांनी, हो ना?
छे, त्यांच्यात कुणीच जखमी झालेले नाहीत, प्रिये,
सैन्यातलं कुणीच नाही.
त्यांना त्या पांढऱ्या केसांच्या पाद्र्य़ाला
भेटायचंय का,
पाद्र्यालाच भेटायचं असेल, हं?
नाही, ते तर त्याच्या दारावरून पुढे निघालेत, प्रिये,
त्याला न भेटताच.
हं, त्यांना तिथे जवळच रहाणाऱ्या त्या शेतकऱ्याला
गाठायचं असेल
मोठा लबाड आहे ना तो?
ते तर त्याचं शेत ओलांडून पुढे आलेत, प्रिये,
आणि आता धावत सुटलेत.
अरे, कुठे निघालास तू? माझ्याबरोबर थांब इथेच!
तू शपथा वाहिल्यास, तू मला फसवतोस, फसवून जातोस?
नाही, मी तुझ्यावर प्रेम करण्याचं वचन दिलं होतं
पण आता मला गेलं पाहिजे... निघालं पाहिजे...
कुलूप निखळलंय, दार चिरफाळलंय
ते वळत आहेत दारात, याच दारात.
त्यांची पावले जमिनीवर दणदणताहेत
आणि त्यांचे डोळे अंगारांसारखे आहेत.
O What Is That Sound
O what is that sound which so thrills the ear
Down inthe valley drumming, drumming?
Only the scarlet soldiers, dear,
The soldiers coming.
Down inthe valley drumming, drumming?
Only the scarlet soldiers, dear,
The soldiers coming.
O what is that light I see flashing so clear
Over the distance brightly, brightly ?
Only the sun on their weapons, dear,
As they step lightly.
Over the distance brightly, brightly ?
Only the sun on their weapons, dear,
As they step lightly.
O what are they doing with all that gear
What are they doing this morning, this morning?
Only the usual manoeuvres, dear,
Or perhaps a warning.
What are they doing this morning, this morning?
Only the usual manoeuvres, dear,
Or perhaps a warning.
O why have they left the road down there
Why are they suddenly wheeling, wheeling?
Perhaps a change in the orders, dear,
Why are you kneeling ?
Why are they suddenly wheeling, wheeling?
Perhaps a change in the orders, dear,
Why are you kneeling ?
O haven't they stopped for the doctor's care
Haven't they reined their horses, their horses ?
Why, they are none of them wounded, dear,
None of these forces.
Haven't they reined their horses, their horses ?
Why, they are none of them wounded, dear,
None of these forces.
O is it the parson they want with white hair;
Is it the parson, is it, is it ?
No, they are passing his gateway, dear,
Without a visit.
Is it the parson, is it, is it ?
No, they are passing his gateway, dear,
Without a visit.
O it must be the farmer who lives so near
It must be the farmer so cunning, so cunning?
They have passed the farm already, dear,
And now they are running.
It must be the farmer so cunning, so cunning?
They have passed the farm already, dear,
And now they are running.
O where are you going? stay with me here!
Were the vows you swore me deceiving, deceiving?
No, I promised to love you, dear,
But I must be leaving.
Were the vows you swore me deceiving, deceiving?
No, I promised to love you, dear,
But I must be leaving.
O it's broken the lock and splintered the door,
O it's the gate where they're turning, turning
Their feet are heavy on the floor
And their eyes are burning.
O it's the gate where they're turning, turning
Their feet are heavy on the floor
And their eyes are burning.
३- निराश्रितांचे दुःख
या शहरात किती एक कोटभर लोक असतील बहुतेक,
काही वाड्यांत जगतात, काही खोनपटांत जगतात,
पण तरीही इथे आपल्यासाठी जागा नाही, प्रिये,
आपल्यासाठी तरीही जागा नाही.
कधीतरी आपल्यालाही देश होता आणि आपल्याला किती
प्रिय वाटत होता तो.
बघ नकाशा, आणि दिसेल तो तिथे तुला.
आता आपण तिथे नाही जाऊ शकत... प्रिये, नाही जाऊ
शकत तिथे आपण.
गावातल्या चर्चच्या अंगणात ते जुनं युचं झाड आहे
प्रत्येक वसंतात नव्याने फुलतं
तसं जुन्या पासपोर्टचं होत नाही, प्रिये, जुन्या
पासपोर्टना तसं जमत नाही.
त्या राजदूताने मूठ टेबलावर आपटली आणि म्हणाला:
‘तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर तुम्ही अधिकृत
नियमांनुसार मेला आहात’.
पण आपण अजूनही जिवंत आहोत, प्रिये, जिवंत आहोत
अजूनही.
मी त्या समितीसमोर गेलो तेव्हा, त्यांनी मला बसायला खुर्ची दिली;
आणि अगदी नम्रपणे सांगितलं, पुढल्या वर्षी या:
पण आज आपण कुठे जायचं, प्रिये, आज कुठे जायचं आपण?
एका जाहीर सभेत गेलो, वक्ता उठून म्हणाला:
‘आपण त्यांना आत येऊ दिलं तर ते आपली रोजीरोटी छिनावून
घेतील’,
तो तुझ्या-माझ्याबद्दल बोलत होता, प्रिये, तुझ्यामाझ्याबद्दल बोलत होता तो.
मला आभाळातून वादळी गडगडाट ऐकू आला असं वाटलं;
मला आभाळातून वादळी गडगडाट ऐकू आला असं वाटलं;
युरोपवर हिटलर आलेला आणि म्हणत होता, ‘ते मेलेच पाहिजेत’;
त्याच्या डोळ्यांसमोर तेव्हा आपणच होतो, प्रिये,
आपणच होतो त्याच्या डोळ्यांसमोर.
एका पिन लावलेल्या जॅकेटच्या खिशात एक पूडल भुभू
पाहिलं,
एक दार उघडलं आणि एका मांजरीला आत घेतलं त्यांनी:
पण ते दोघे काही जर्मन ज्यू नव्हते, प्रिये,
जर्मन ज्यू नव्हते ते.
बंदरात गेलो आणि धक्क्यावर उभा राहिलो,
मुक्त असल्यागत तिथं मासे पोहोताना पाहिले
फक्त दहा फुटाच्या अंतरावर, प्रिये, फक्त दहा
फुटाच्या अंतरावर.
जंगलातून फिरून आलो, झाडांझाडांत पक्षी बसलेले;
त्यांच्यात कुणी राजकारणी नव्हते आणि मस्त गात
होते ते निर्घोर
ते माणसाच्या वंशाला आले नव्हते, प्रिये,
माणसाच्या वंशाला नव्हते ते.
स्वप्न पडलं मला, हजार मजली इमारतीचं
हजारो खिडक्या आणि हजारो दारं;
त्यातलं एकही आपलं नव्हतं, प्रिये, आपलं एकही
नव्हतं.
बर्फ कोसळताना उघड्या पठारावर उभा राहिलो तेव्हा,
दहा हजार सैनिक इकडून तिकडे संचलन करीत होते:
तुझा माझा शोध घेत होते ते, प्रिये, तुझा माझा
शोध घेत होते.
Refugee Blues
Say this city has ten million souls,
Some are living in mansions, some are living in holes:
Yet there's no place for us, my dear, yet there's no place for us.
Once we had a country and we thought it fair,
Look in the atlas and you'll find it there:
We cannot go there now, my dear, we cannot go there now.
In the village churchyard there grows an old yew,
Every spring it blossoms anew:
Old passports can't do that, my dear, old passports can't do that.
The consul banged the table and said,
"If you've got no passport you're officially dead":
But we are still alive, my dear, but we are still alive.
Went to a committee; they offered me a chair;
Asked me politely to return next year:
But where shall we go to-day, my dear, but where shall we go to-day?
Came to a public meeting; the speaker got up and said;
"If we let them in, they will steal our daily bread":
He was talking of you and me, my dear, he was talking of you and me.
Thought I heard the thunder rumbling in the sky;
It was Hitler over Europe, saying, "They must die":
O we were in his mind, my dear, O we were in his mind.
Saw a poodle in a jacket fastened with a pin,
Saw a door opened and a cat let in:
But they weren't German Jews, my dear, but they weren't German Jews.
Went down the harbour and stood upon the quay,
Saw the fish swimming as if they were free:
Only ten feet away, my dear, only ten feet away.
Walked through a wood, saw the birds in the trees;
They had no politicians and sang at their ease:
They weren't the human race, my dear, they weren't the human race.
Dreamed I saw a building with a thousand floors,
A thousand windows and a thousand doors:
Not one of them was ours, my dear, not one of them was ours.
Stood on a great plain in the falling snow;
Ten thousand soldiers marched to and fro:
Looking for you and me, my dear, looking for you and me.

************
४-काळ काहीच म्हणणार नाही
काळ काहीच म्हणणार नाही पण म्हणेल, मी म्हणालेलो तुला,
काळाला फक्त ठाऊक असतं, आपल्याला किंमत किती
चुकवावी लागेल;
मला सांगता आलं असतं तर मी सांगितलं असतं तुला.
विदूषक त्यांचे खेळे करतात, तेव्हा आपण रडायचं
असतं.
वादक गाणी वाजवतात तेव्हा आपण धडपडायचं असतं.
काळ काहीच म्हणणार नाही, पण म्हणेल मी म्हणालेलो
तुला.
सद्भाग्याच्या काही गोष्टी सांगता येत नसतात
म्हणा,
मी सांगू शकणार नाही इतकं प्रेम आहे माझं
तुझ्यावर,
मला सांगता आलं असतं तर सांगितलं असतं मी तुला.
वाहत सुटतात तेव्हा वारे आलेलेच असतात कुठूनसे
वाहत सुटतात तेव्हा वारे आलेलेच असतात कुठूनसे
पान शीर्ण होतात याची कारणं असतीलच काही
काळ काहीच म्हणणार नाही, पण म्हणेल मी म्हणालेलो
तुला.
कदाचित् गुलाबांना खरोखरच फोफावायचं असेल,
ते दृश्य टिकून राहू पाहातही असेल,
मला सांगता आलं असतं तर मी सांगितलं असतं तुला.
समज, सगळे सिंह उठून चालते झाले
आणि सगळे झरे वाळून आणि सारे सैनिक पळून गेले;
तरीही काळ मी म्हणालेलो तुला- यापरतं काहीही म्हणणार नाही?
मला सांगता आलं असतं तर मी सांगितलं असतं तुला.
Time will say nothing
Time will say nothing but I told you so,
Time only knows the price we have to pay;
If I could tell you I would let you know.
If we should weep when clowns put on their show,
If we should stumble when musicians play,
Time will say nothing but I told you so.
There are no fortunes to be told, although,
Because I love you more than I can say,
If I could tell you I would let you know.
The winds must come from somewhere when they blow,
There must be reasons why the leaves decay;
Time will say nothing but I told you so.
Perhaps the roses really want to grow,
The vision seriously intends to stay;
If I could tell you I would let you know.
Suppose the lions all get up and go,
And all the brooks and soldiers run away;
Will Time say nothing but I told you so?

Comments
Post a Comment