पुस्तक- एमिली डिकिन्सन


पुस्तक

पुस्तक एक अशी अतुल्य आगळी युध्दनौका
नेते जी दूरदूरच्या भूमींवर दिशांतराला
किंवा एखाद्या उत्फुल्ल नाचऱ्या कवितेचे पान
जसे दिशा ठरवते- कोण असेल तितके दिशादर्शक...
अगदी निर्धनालाही झेपतो हा प्रवास
कुठलेही खडतर कष्ट न उपसता :
किती साधासा आहे हा
मानवी आत्म्याला हलकेच वाहून नेणारा रथ
एमिली डिकिन्सन

A Book

There is no frigate like a book
To take us lands away,
Nor any coursers like a page
Of prancing poetry.
This traverse may the poorest take
Without oppress of toll;
How frugal is the chariot
That bears a human soul! 


Comments

Popular posts from this blog

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.