1-Girls reading Books - पुस्तकं वाचणाऱ्या मुली- मूळ मराठी कविता- कविता महाजन
कविता महाजनच्या बारा कविता तिला इंग्रजीत अनुवाद करून पाठवायच्या होत्या.
त्या सहज म्हणून केल्या. पण इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणं हातखंडा झालंय, तसं उलट नाही झालं. पण
निदान अमराठी वाचकांपर्यंत कविताची कविता पोहोचली हे पुरेसं झालं. त्या बारा कविता इथे, या ब्लॉगवर
ओळीने देते आहे.
निदान अमराठी वाचकांपर्यंत कविताची कविता पोहोचली हे पुरेसं झालं. त्या बारा कविता इथे, या ब्लॉगवर
ओळीने देते आहे.
Under
the shade green of a tree
Sits
a Girl reading a book
I
am afraid for her…
Her
world ensconcing her
I
am afraid would just disappear…
Along
with its norms and traditions,
Mother’s
calls, and other humans,
And the arms they might be
holding close.
And
a girl sitting on her patio,
Under
a patchwork-quilt
Holding
a pen over a notebook and writing,
in
the faded light of the dawn.
She
looks more dangerous than a murderer.
Her
tongue has turned purple blue…
As
she licks the nib of her pen intermittently
Leaves
after leaves of the notebook
No
more remain white and clean.
She
dirties them with letters…
Oh…
that is so heartrending… terrifying
The girl has tight three plaited braids
End
of each has bright red ribbons blooming into flowers
She
wears a school uniform, wears shoes and socks proper,
Shoulders
her schoolbag and waves bye-bye to her mother.
Opening
the gate she enters the street.
She
kicks off the fears of the home, the gate and the street
And
walks towards the school
Her
mind resonates with just one poem which is now by heart
And
a mathematics problem she could solve halfway through
Oh,
such a girl is not to be taken lightly
She
is just like an explosive,
So
full of dry gunpowder
On
the next turn she meets another girl
And
as they walk with their hands around each other’s necks
A
third one approaches.
And
then three more come from a lane on the left,
Another
five from an alley on the right.
A
bus stops by and pours some seventeen girls
A
car has carried four more.
Now
it is difficult to count them.
They
are popping out of the soil like grass blades
And
descending from the sky like sunrays
They
walk, oh the speed…
They
heard the prayer bell it seems
These
girls, laughing, dancing and chatting
They
are like war-tanks
Or
a bomber plane
What
arms can be used
To
destroy them
With
their books, note-books, pens, ink, poems, maths problems and schoolbags
With
their streets, homes, schools, teachers and prayers
How
can the gates of exit be closed for them…
Using
what tools?
How
long?
How
long will this war go on,
Against
the uniformed girls?
पुस्तक वाचणार्या मुली
हिरव्या झाडाच्या सावलीत बसून
पुस्तक
वाचणार्या मुलीची
भीती
वाटते
भीती वाटते की तिच्या आजूबाजूचं जग
अदृश्य
झालेलं असतं त्यावेळी
त्या
जगातल्या प्रथा परंपरांसहीत
आईच्या
हाकांसहीत माणसांसहीत
माणसांजवळ
असलेल्या
हत्यारांसहीत
घराच्या ओसरीत पहाटे गोधडी पांघरून
अंधुक
अंधुक उगवतीच्या उजेडात
वहीत
पेनानं लिहीत बसलेली मुलगी तर
भयंकर
दिसते एखाद्या खुन्याहून
तिची
जीभ निळीजांभळी झालेली असते
अधूनमधून
पेनचं निब जिभेवर टेकवल्यानं
पानांमागून
पानं राहत नाहीत पांढरी
अक्षरांनी
अस्वच्छ होत राहतात कागद
हे
उरात धडकी भरवणारंच
मुलगी गच्च तिपेडी वेण्या घालते
लाल
रिबिनींची फुलं नाचवत
गणवेश
चढवते मोजेबुट चढवते पायांत
आणि
पाठीला दप्तर लावून आईला टाटा म्हणत
घराचं
दार उघडून रस्त्यावर येते
घरदाररस्ता
सगळ्याचा धाक पायदळी तुडवत
चालत
राहते शाळेच्या दिशेने
तिच्या
मनात केवळ एक कविता पाठ केलेली
आणि
एक गणित अर्धंच सुटलेलं
अशी
मुलगी कमी नसते
एखाद्या
स्फोटकापेक्षा ज्यात ठासून भरलेला
असतो
दारूगोळा
वळणावर मुलीला दुसरी मुलगी भेटते
गळ्यात
हात घालून चालताना तिसरी येते
मग
अजून तिघी येतात डाव्या गल्लीतून
आणि
उजव्या बोळीतून पाच
मग
एका बसमधून उतरतात सतरा
एका
कारमधून चार
मुलींना
मोजणं अवघड होऊन जातं
की
जणू त्या जमिनीतूनही उगवताहेत
गवतागत
आणि आकाशातूनही
उतरताहेत
उन्हासारख्या
त्या चालतात वेगाने झपाझपा
प्रार्थनेची
बेल ऐकू आली म्हणून
हसत
नाचत बोलत जाणार्या मुली
एक
रणगाडाच
किंवा
एक विमान बॉम्बफेक करणारं
या मुलींसाठी कोणतं हत्यार परजावं
की
नष्ट होतील त्यांच्यासोबत
पुस्तकं
वह्या पेनं शाई कविता गणितं दप्तरं
नष्ट
होतील रस्ते घरं शाळा शिक्षक प्रार्थना
घरातून
बाहेर पडण्याची दारं बंद होतील
अशी
कोणती हत्यारं परजावीत आता
आणि
कितीवेळा?
किती
काळ
चालणार
आहे युद्ध
गणवेश
घातलेल्या मुलींसोबत?
Comments
Post a Comment