भाषा- कार्ल सॅन्डबर्ग
भाषा
कुठल्याही भाषेला नसते एखादी मूठ
कुणी माणसांनी त्यावर पकड कायम
करावी अशी
नाही ठेवता येत कोरून तिच्यावर
कुणालाही आठवणींच्या खुणा.
भाषा... असते एक नदी,
हजारो वर्षांनंतर एखाद्या वेळी
ती समुद्राकडे धाव घेताना आपला
मार्ग बदलते.
जणू असते ती पर्वताच्या
विसर्गासारखी
दऱ्याखोऱ्यांकडे धावत निघालेली
देशोदेशांतून फिरत निघालेली
सीमा ओलांडून जात, मातीशी मिसळत.
नद्यांसारख्याच मरूनही जातात भाषा.
आज तुमच्या जिभेवर खेळणारे
लफ्फेदार शब्द
विचारांना आकार देत फुटत रहातात
आज आणि आत्ता
दातांमधून, ओठांमधून बोलले जाणारे
शब्द.
विरून जातील चित्रलिपींसारखेच...
आणखी दहा हजार वर्षांनंतर...
गात रहा... पण लक्षात ठेवा गाताना
तुमचे गीत मरून जाते, बदलून जाते
उद्यासाठी असणार नाही ते इथे
दहा हजार वर्षांपूर्वी वाहाणाऱ्या
वाऱ्यासारखेच...
कार्ल सॅन्डबर्ग
Languages
There are
no handles upon a language
Whereby
men take hold of it
And
mark it with signs for its remembrance.
It is a
river, this language,
Once in
a thousand years
Breaking
a new course
Changing
its way to the ocean.
It is
mountain effluvia
Moving
to valleys
And
from nation to nation
Crossing
borders and mixing.
Languages
die like rivers.
Words
wrapped round your tongue today
And
broken to shape of thought
Between
your teeth and lips speaking
Now and
today
Shall
be faded hieroglyphics
Ten
thousand years from now.
Sing—and
singing—remember
Your
song dies and changes
And is
not here to-morrow
Any
more than the wind
Blowing ten thousand years ago.
Carl Sandberg
Comments
Post a Comment