सारं अखंड ठेवायचं म्हणून- मार्क स्ट्रॅन्ड




सारं अखंड ठेवायचं म्हणून

एखाद्या शिवारात
मी शिरतो
तेव्हा ते शिवार हरवतं अस्तित्व.
असं होतंच,
नेहमी तसंच.
माझं अस्तित्व जिथेजिथे उमटतं
मी असेनासा होतो तिथे.

मी चालतो जेव्हा
हवेला भेदत जातो
आणि नेहमीच
हवा सरकत रहाते पुढे
अवकाशाचे खंड भरून काढायला
माझ्या देहाने रिकामे केलेले.

आपणा सर्वांकडे काहीतरी कारणं असतात
पुढे सरकण्यासाठी...
मी ही सरकतो पुढे
सारं काही अखंड ठेवायचं म्हणून

मार्क स्ट्रॅन्ड



मूळ कविता

Keeping Things Whole

In a field
I am the absence
of field.
This is
always the case.
Wherever I am
I am what is missing.

When I walk
I part the air
and always
the air moves in   
to fill the spaces
where my body’s been.

We all have reasons
for moving.
I move
to keep things whole.

By Mark Strand









Comments

Popular posts from this blog

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.

पुस्तक- एमिली डिकिन्सन