फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे... बॉब डिलान
फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे...
कुठे
गेला होतास माझ्या लाडक्या बाळा
सांग
कुठे होतास तू एवढा वेळ, बाळा
बारा
धुकटलेल्या पर्वतांच्या कडीखांद्यांवरून मी फिरत होतो
सहा
कठोर राजमार्गांवरून चालत, रेंगत फिरलो मी
सात
खिन्नरानांच्या मधून पावले टाकत राहिलो मी
सात
निर्जीव निश्चेत सागरांच्या समोर उभा झालो मी
एका
मसणवटीच्या मुखातून दहा हजार मैल चालत गेलो मी
आणि आता
फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार
भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे
तू काय
पाहिलंस बाळा, माझ्या लाडक्या बाळा
सांग तू
काय पाहिलंस तरी काय बाळा
मी
पाहिले एक तान्हुले... घेरलेले हिंस्र लांडग्यांनी
मी
पाहिला एक रत्नखचित राजमार्ग कुणीच पाऊल न ठेवलेला
मी
पाहिली एक काळवंडलेली डहाळी... तीतून ठिबकत होतं रक्त सतत
मी
पाहिली एक खोली माणसांनी गच्च- हातातले हातोडे त्यांच्या रक्तरंजित
मी
पाहिली एक शुभ्र शिडी पाण्यात बुडून गेलेली
मी
पाहिली दहाहजार माणसं बोलू पाहाणारी... जिभा छिन्न झालेली
मी
पाहिल्या नंग्या तलवारी आणि बंदुका- हातांत लहान पोरांच्या
आणि आता
फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार
भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे
आणि काय
ऐकलंस, माझ्या लाडक्या बाळा?
कायकाय
ऐकलंस, सांगशील ना बाळा?
मी ऐकली
गर्जना एका वादळाची... ताकीद होती कशाची
मी ऐकली
गर्जना एका लाटेची... जी बुडवून टाकू शकते साऱ्या जगाला
मी ऐकले
ढोल शंभर ढोलवादकांचे... हात ज्यांचे होते तप्त आगीसारखे
मी ऐकले
दशसहस्र लोक कुजबुजताना... आणि ऐकतच नव्हतं कुणी
मी ऐकला
आवाज एका व्यक्तीच्या उपाशी पोटाचा... आणि खूप माणसे हसतानाचा
मी ऐकले
एक गीत एका कवीचे... जो मरून गेला होता गटारात
मी ऐकला
आवाज एका विदूषकाचा... जो गल्लीत छपून रडत होता
आणि आता
फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार
भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे
कुणी
भेटलं का तुला, माझ्या लाडक्या बाळा?
कोण
भेटलं तुला सांगशील, माझ्या बाळा?
भेटलं
मला एक लहान मूल, मेलेल्या शिंगराजवळ बसलेलं
एक गोरा
माणूस भेटला मला, काळ्या कुत्र्याला फिरवून आणत होता
एक तरुण
स्त्री भेटली मला, तिचा देह जळत होता
आणि
भेटली एक किशोरी, तिने माझ्या हाती दिलं इंद्रधनू
एक
माणूस भेटला, प्रेमात विध्द झालेला
आणि
दुसरा भेटला, द्वेषात विध्द झालेला
आणि आता
फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार
भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे
आणि आता
तू काय करणार आहेस, माझ्या लाडक्या बाळा?
सांगशील
मला- तू काय करणार आता, बाळा?
मी- मी
मागे सरणार हा भयंकर पाऊस कोसळायला सुरुवात होण्यापूर्वी
घनगर्द
काळ्या जंगलात खोलवर चालत जाईन मी
जिथे अनेक
लोक आहेत, आणि त्यांचे हात अगदी रिकामे
जिथे
विषाच्या गुटिका त्यांच्या पाण्यातून महापुरासारख्या शिरतात
दरीतल्या
घराच्या अंगणात कुबट गलिच्छ तुरुंगाची सुरुवात होते
तिथल्या
मृत्यूदात्याचा चेहरा नेहमीच नीटच झाकलेला असतो
तिथली
भूक अतिशय ओंगळ आहे, तिथल्या आत्म्यांचा विसर पडलेला आहे
एकरंग
सारा काळा, काहीच नसणे हीच संख्या
आणि मी
हे सारे सांगेन, त्यावर विचार करेन आणि ते बोलून दाखवेन... श्वास होईल तो माझा
पर्वतावरून
त्याचे प्रतिबिंब फेकेन सभोवर... जे दिसेल साऱ्या आत्म्यांना
मग उभा
राहीन मी महासागराच्या पृष्ठावर... बुडेपर्यंत
मला
माझे पूर्ण गीत ठावे असेल... गळ्यातून उमटेपर्यंत
... आणि
आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार
भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे
बॉब डिलान
Oh, where have you been, my blue-eyed son?
Oh, where have you been, my darling young one?
I've stumbled on the side of twelve misty mountains
I've walked and I've crawled on six crooked highways
I've stepped in the middle of seven sad forests
I've been out in front of a dozen dead oceans
I've been ten thousand miles in the mouth of a graveyard
And it's a hard, and it's a hard, it's a hard, and it's a hard
And it's a hard rain's a-gonna fall

Oh, what did you see, my blue-eyed son?
Oh, what did you see, my darling young one?
I saw a newborn baby with wild wolves all around it
I saw a highway of diamonds with nobody on it
I saw a black branch with blood that kept drippin'
I saw a room full of men with their hammers a-bleedin'
I saw a white ladder all covered with water
I saw ten thousand talkers whose tongues were all broken
I saw guns and sharp swords in the hands of young children
And it's a hard, and it's a hard, it's a hard, it's a hard

Comments
Post a Comment