मी ऐकले तुझे गीत- हॅरी रॉडनी बेनेट



मी ऐकले तुझे गीत

पहाटेचे भस्म किंचित उललेले असताना...
फुललेल्या पाकळीपाकळीवर रुपेरी दंव डंवरले असताना
मी ऐकले तुझे गीत
उगवत्या सूर्याने पिऊनही टाकले सारे दंव
पण नंतर रेंगाळणाऱ्या दिवसातही तुझे गीत मला भासत राहिले
शांत कातर वेळीही येत राहिले कानी
फुले, पाखरे निजवण्यासाठी आली संध्या तेव्हाही
गर्द रानीच्या झऱ्याचे झुळझुळ गाणे हर्षभरे
मला भासले तुझेच स्वर स्वप्नांच्या उतारावर गात चाललेले
अखेरची हाक येईल जेव्हा स्वच्छ निनादत
साऱ्यापासून व्हायचे असेल दूर, विलग...
समोर पसरलेल्या अज्ञात दरीचे भय नाही मला जाणवणार
डोळे मिटता मिटता, जेव्हा येईल तुझे गीत कानावर...

हॅरी रॉडनी बेनेट



I heard you singing

 

I heard you singing when the dawn was grey
And silver dew on ev'ry blossom lay;
Though the rising sun too soon drank up the dew,
I thought I heard you singing all the long day through.
I heard you singing in the silent hour
When evening came with sleep for bird and flow'r;
A song like happy murmuring of woodland streams,
I thought I heard you singing down the vale of dreams.
Beloved, when the last call echoes clear,
And I must part from all that is so dear,
I shall not fear the valley that before me lies,
If I may hear you singing as I close my eyes. 

Comments

Popular posts from this blog

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.

पुस्तक- एमिली डिकिन्सन