एकुटवाण्या पाईनचं निसटतं चिंतन- हब्बा खातून


एकुटवाण्या पाईनचं निसटतं चिंतन

तो कसा तेजस्वी आहे, पाहिलं आहेस तू त्याला?
पहा एकदा त्याच्याकडे!
कधीही न निजणारा एक निर्झर बनून मी जाते त्याच्या शोधात
होते एक अस्वस्थसा ओढा.
दूरदूरच्या जंगलामध्ये मी उभी रहाते एकुटवाणी
पाईनचा वृक्ष होऊन...
तो- माझा लाकूडतोड्या, येईपर्यंत.
तो येतो लाकूड तोडायला.
आणि त्याच्या त्या आग फुलवण्याची भीती वाटते मला.
तो आता जाळेल माझे प्रत्यंगी ओंडके तरीही, मी झळाळून उठते.
माझ्या रक्षेचं बनून जाईल मद्य!


Lol Of The Lonely Pine - Poem by Habba Khatoon

The one who dazzles - have you seen that one?
Upon him look!
A sleepless stream in search of him I run,
A restless brook.
In far off woods, a lonely pine I stood
Till he appeared,
My woodcutter, and came to cut the wood.
His fire I feared,
Yet though he burn my logs, behold I shine,
My ashes wine!

(लोल म्हणजे पिटुकला विचार. हब्बा खातूनने या कविताशैलीची निर्मिती केली.)

Comments

Popular posts from this blog

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.

पुस्तक- एमिली डिकिन्सन