आम्ही आहोत काटेरी बाया- मुग्धा कर्णिक- मूळ आणि अनुवादही.
आम्ही आहोत काटेरी बाया
पण त्या ठोठो बोंबलून रेकणाऱ्या
माणसापेक्षा कमीच
तो जो माणूस आणि त्याचे झोंड अनुयायी
भारताच्या आधीच घोळात असलेल्या
संस्कृतीतल्या
नीच घोळांचे समर्थन करतात
आणि आम्हा बायांना मानाने जगू
देणाऱ्या नव्या लोकशाही मूल्यांना दडपू पाहातात.
तितक्याही काटेरी नाहीत आम्ही...
व्हायला हवं अधिक काटेरी
बायको करून तिचा किमान मान न
ठेवलेला नेता
तुम्ही ओरडून सांगता हा
विश्वगुरू
बायांनी दहादहा पोरं काढावीत
सांगणारा अडाणी लफंगा
तुम्ही ओरडून सांगता हा जगद्गुरू
आणि तुमच्या मागे येणारा बिनडोक
कळप
हाच पवित्र भारत देश म्हणता
या विंचूकाट्याचा उतारा द्यायला
व्हायला हवं आम्हाला काटेरी-
अधिक काटेरी...
जातीच्या उतरंडी हव्यात त्यांना,
स्त्री पायाची दासीच हवी त्यांना
त्यांचे ढोल तेव्हाही वाजत होते
चितेवरची जळती जिवंत बाई चितेवरच
जळावी म्हणून
आताही त्यांचे ढोल वाजतात
साऱ्या बाया गुलामीत मग्न झुलत
गिरगिरत रहाव्यात म्हणून
त्या ढोलांच्या कान फाडणाऱ्या
नादाइतक्या काटेरी नाहीत आम्ही.
व्हायला हवं अधिक काटेरी...
त्यांचे भगवे झेंडे होत चाललेत
दुहेरी
सापाच्या फाटलेल्या जिभांसारखे
लपलप करीत रहातात
आमच्या खाजगी आणि सार्वजनिक
अवकाशांत घुसतात.
त्या भगव्या झेंड्यांचे टोकेरी
एकारलेपण पहा
आणि मग ताडून पहा आमचा काटेरीपणा
धार्मिक स्वातंत्र्याच्या
नावाखाली
वाट्टेल त्या पध्दती, रूढी,
परंपरांचे काटे पसरून ठेवत रहातात त्यांचे हात
आणि मग आम्ही पांघरून घेतो
काटेरी कवचांचे चिलखत
व्हायला हवं अधिक काटेरी...
ते तिकडे हिरवे झेंडेवाले तर
आमच्यासाठी चाबूक काढूनच उगारून रहातात
त्यांच्या अल्ला, त्यांचा
प्रेषित, त्यांचा ग्रंथ, त्यांचे कायदे सारे काही-
नसते माणसाच्या आईसाठी, नसते
कुठल्याच बाईसाठी
आणि दूर मध्यपूर्वेच्या वाळवंटी
दलदलीत नजर लावून
इथे रुतत रहातात गाळात आमच्यासकट
तितक्या तर नाही आम्ही काटेरी.
व्हायला हवं अधिक काटेरी...
अनन्वित यातना भोगत मरून
पडलेल्या
नागव्या स्त्रीदेहांवर राजकारण
करणाऱ्या झुंडी पाहातो आम्ही
आपल्याच देशात संरक्षणासाठी उभे
राहिलेले बंदूकवाले
जेव्हा निःशस्त्र बायांना भोगून
फेकतात
त्या तसल्या जिवंत
स्त्रीदेहांच्याही न संपणाऱ्या कथा
गप्प पाहातो आम्ही
देशाच्या अर्ध्या अंगावर आलेले
काटे दिसत असतील तुम्हाला.
म्हणून म्हणता आम्ही काटेरी बाया?
विखारी बाया, निखारी बायाही आहोत
आम्ही
आणि व्हायचंय अधिक काटेरी
निरागस कोवळ्या मुलींना ठार
करणाऱ्यांच्या
कोवळ्या नुकत्याच फुटलेल्या
मुलींना बाजारात विकणाऱ्यांच्या
ती कशी दिसते या चर्चेच्या
भानगडीत स्त्रीचं मन कचऱ्यात टाकणाऱ्यांच्या
या बदफैली स्वच्छतेच्या चकचकाटी
भारतात
आमची पालवी केव्हाच काटे झाली...
हलकटांना रुपणाऱ्या काटेरी बाया
आहोत आम्ही.
व्हायचंय अधिक काटेरी.
साधा प्रवास करायचा तर तुमचे
लिबलिबित स्पर्श सोसायचे मुकाट!
साधी रोजी कमवायची तर तुमच्या
गिळगिळीत अपेक्षांपासून लपायला मरायचं!
साधं जगायचं तर आपल्याला
चारित्र्यहीन ठरवतील की काय याची भीती मनात!
तुम्ही दिलेलं कचकड्याचं देवीपद
नाकारणाऱ्या आम्ही
आम्हाला हवंय हक्काचं माणूसपण
ते मिळवेपर्यंत रहातील
आमच्या बुध्दीचे काटे असेच
तेजधार
एकेकजण ठणकावून सांगेल
मी आहे एक काटेरी भारतीय स्त्री
आणि होणार आहे अधिक काटेरी...
खड्ड्यात घाला तुमच्या
संस्कृतीचे बेगड
खड्ड्यात घाला तुमच्या प्रेषितांचे
बिघाड
आम्ही होणार अधिक काटेरी
नरकाच्या नावानं चांगभलं
नरकाच्या नावानं चांगभलं
नरकाच्या नावानं चांगभलं.
आम्ही आहोत काटेरी बाया
पण त्या ठोठो बोंबलून रेकणाऱ्या
माणसापेक्षा कमीच
तो जो माणूस आणि त्याचे झोंड अनुयायी
भारताच्या आधीच घोळात असलेल्या
संस्कृतीतल्या
नीच घोळांचे समर्थन करतात
आणि आम्हा बायांना मानाने जगू
देणाऱ्या नव्या लोकशाही मूल्यांना दडपू पाहातात.
तितक्याही काटेरी नाहीत आम्ही...
व्हायला हवं अधिक काटेरी
बायको करून तिचा किमान मान न
ठेवलेला नेता
तुम्ही ओरडून सांगता हा
विश्वगुरू
बायांनी दहादहा पोरं काढावीत
सांगणारा अडाणी लफंगा
तुम्ही ओरडून सांगता हा जगद्गुरू
आणि तुमच्या मागे येणारा बिनडोक
कळप
हाच पवित्र भारत देश म्हणता
या विंचूकाट्याचा उतारा द्यायला
व्हायला हवं आम्हाला काटेरी-
अधिक काटेरी...
जातीच्या उतरंडी हव्यात त्यांना,
स्त्री पायाची दासीच हवी त्यांना
त्यांचे ढोल तेव्हाही वाजत होते
चितेवरची जळती जिवंत बाई चितेवरच
जळावी म्हणून
आताही त्यांचे ढोल वाजतात
साऱ्या बाया गुलामीत मग्न झुलत
गिरगिरत रहाव्यात म्हणून
त्या ढोलांच्या कान फाडणाऱ्या
नादाइतक्या काटेरी नाहीत आम्ही.
व्हायला हवं अधिक काटेरी...
त्यांचे भगवे झेंडे होत चाललेत
दुहेरी
सापाच्या फाटलेल्या जिभांसारखे
लपलप करीत रहातात
आमच्या खाजगी आणि सार्वजनिक
अवकाशांत घुसतात.
त्या भगव्या झेंड्यांचे टोकेरी
एकारलेपण पहा
आणि मग ताडून पहा आमचा काटेरीपणा
धार्मिक स्वातंत्र्याच्या
नावाखाली
वाट्टेल त्या पध्दती, रूढी,
परंपरांचे काटे पसरून ठेवत रहातात त्यांचे हात
आणि मग आम्ही पांघरून घेतो
काटेरी कवचांचे चिलखत
व्हायला हवं अधिक काटेरी...
ते तिकडे हिरवे झेंडेवाले तर
आमच्यासाठी चाबूक काढूनच उगारून रहातात
त्यांच्या अल्ला, त्यांचा
प्रेषित, त्यांचा ग्रंथ, त्यांचे कायदे सारे काही-
नसते माणसाच्या आईसाठी, नसते
कुठल्याच बाईसाठी
आणि दूर मध्यपूर्वेच्या वाळवंटी
दलदलीत नजर लावून
इथे रुतत रहातात गाळात आमच्यासकट
तितक्या तर नाही आम्ही काटेरी.
व्हायला हवं अधिक काटेरी...
अनन्वित यातना भोगत मरून
पडलेल्या
नागव्या स्त्रीदेहांवर राजकारण
करणाऱ्या झुंडी पाहातो आम्ही
आपल्याच देशात संरक्षणासाठी उभे
राहिलेले बंदूकवाले
जेव्हा निःशस्त्र बायांना भोगून
फेकतात
त्या तसल्या जिवंत
स्त्रीदेहांच्याही न संपणाऱ्या कथा
गप्प पाहातो आम्ही
देशाच्या अर्ध्या अंगावर आलेले
काटे दिसत असतील तुम्हाला.
म्हणून म्हणता आम्ही काटेरी बाया?
विखारी बाया, निखारी बायाही आहोत
आम्ही
आणि व्हायचंय अधिक काटेरी
निरागस कोवळ्या मुलींना ठार
करणाऱ्यांच्या
कोवळ्या नुकत्याच फुटलेल्या
मुलींना बाजारात विकणाऱ्यांच्या
ती कशी दिसते या चर्चेच्या
भानगडीत स्त्रीचं मन कचऱ्यात टाकणाऱ्यांच्या
या बदफैली स्वच्छतेच्या चकचकाटी
भारतात
आमची पालवी केव्हाच काटे झाली...
हलकटांना रुपणाऱ्या काटेरी बाया
आहोत आम्ही.
व्हायचंय अधिक काटेरी.
साधा प्रवास करायचा तर तुमचे
लिबलिबित स्पर्श सोसायचे मुकाट!
साधी रोजी कमवायची तर तुमच्या
गिळगिळीत अपेक्षांपासून लपायला मरायचं!
साधं जगायचं तर आपल्याला
चारित्र्यहीन ठरवतील की काय याची भीती मनात!
तुम्ही दिलेलं कचकड्याचं देवीपद
नाकारणाऱ्या आम्ही
आम्हाला हवंय हक्काचं माणूसपण
ते मिळवेपर्यंत रहातील
आमच्या बुध्दीचे काटे असेच
तेजधार
एकेकजण ठणकावून सांगेल
मी आहे एक काटेरी भारतीय स्त्री
आणि होणार आहे अधिक काटेरी...
खड्ड्यात घाला तुमच्या
संस्कृतीचे बेगड
खड्ड्यात घाला तुमच्या प्रेषितांचे
बिघाड
आम्ही होणार अधिक काटेरी
नरकाच्या नावानं चांगभलं
नरकाच्या नावानं चांगभलं
नरकाच्या नावानं चांगभलं.
I am a Nasty
Indian Woman
We are nasty
women
But not as
nasty as the man who shouts and rants all the time
That man and
his followers- the trolls
Go on and on
about the Indian Culture
Which
already wreaked havoc, played mischief with us women.
They try to
trample the democratic values
Which have
the power to let us live with self-respect.
We are not
as nasty as them,
We ought to
become nastier.
A husband
who disrespected his wife and left her
They
proclaim he is a great Universal Teacher
A brute
uncouth, who tells women to birth at least ten boys
They chant
that he is the ‘Teacher of the World’
And the herd
that follows you
You say is
the sacred nation of Bharat!!
We need to
crush the scorpion sting
By becoming
nasty
By becoming
nastier…
They
love their caste grids,
They
wish to keep their wives and mothers at their feet, forever enslaved
Their
drums were beating hard- when the Satees were being burnt alive
On
their husbands’ funeral pyres
Now
they beat their drums with the same vigour and venom
To
make us women oblivious of slavery and dance to their numbing tunes
We
are not as nasty as those drumbeats, which tear our eardrums…
We
need to be nastier!
Their
saffron flags are twisting and twirling,
Forked
like the snake tongues
They
usurp our private spaces and pollute the public spaces
Just
observe those flags- they are rigid and sharp like poison arrows
And
then compare our nastiness
They
love their religious freedom,
A
route for securing the nasty traditions and norms.
And
then we have to wear our nasty armours
To
become nastier…
And
those bearers of green flags are ever ready with their whips for our backs
Their
Allah, their Prophet, their holy book and rule-book… is for men
Nothing
is for the mother of men or any woman
They
gaze at the far away quick sands of desert in the middle-east
And
they drown in marshlands here… along with us
We
aren’t as nasty as them…
We
need to be nastier.
We
witness the raped and tortured women
Their
naked bodies… and the mob plays of politics around them
The
gunners meant to protect us
Grab
and enter the helpless women
We
hear the whispers of those living corpses
Wordlessly
watch and live the agony
Half
the nation- we women get goose-bumps of disgust
Is
that why you call us nasty?
We
are nasty, venomous and we burn…
We
need to be nastier…
Killing
the unborn or newly born tender girls
Selling
the just blooming girls in flesh markets
Throwing
our minds into garbage while leering at our beauty
In
this country of nasty cleanliness campaigns
Our
leaflets have turned into thorny, nasty expressions
We
will be stinging nastily the scoundrels
We
will need to be nastier…
We
have to bear so much-
Your
filthy touches as we go about our routine work
Your
nasty expectations when we work for our living…
And
you choose to call us sluts when, just to live, we struggle
We
deny the plastic imagery of goddesses thrust upon us by you
We
want just to be human- to be known as- to be recognized as
Our
minds will be alive with sharpened nastiness till then
Each
one of us will proclaim
I
am a nasty Indian Woman
And
I will be nastier
Hell
with your tinsel gaudy culture
Hell
with your demented past prophets
We
will be nastier and nastier…
“Hell
yeah!
Hell
yeah!
Hell
yeah!”
Comments
Post a Comment