बर्टोल्ट ब्रेख्श्टच्या तीन कविता- पेटवलेली पुस्तके. निरोप आणि दुष्टाव्याचा मुखवटा.



१८९८-१९५६ या काळात जगलेला जर्मन कवी बर्टोल्ट ब्रेश्ट हा नाटककारही होता आणि नाट्यदिग्दर्शकही. हिटलरचा उदय होताच १९३३ साली तो जर्मनी सोडून गेला. आपला देश अधिकाधिक फॅशिस्ट, ज्यूद्वेष्टा, युध्दस्वी होत चाललेला पाहून तळमळणाऱ्या दृष्टीतून त्याने अनेक कविता लिहिल्या. त्यातील एक ही पुस्तके जाळण्यासंबंधीची... नाझी प्रचारप्रमुख जोसेफ गोबेल्सने याचे फर्मान काढले होते. जर्मन संस्कृतीविरुध्द वाटणारी 'किडकी' पुस्तके जाळून टाकण्याचे त्याचे आदेश होते. या जाळलेल्या पुस्तकांत थॉमस मान. अर्नेस्ट हेमिंग्वे आणि अगदी हेलन केलरच्या पुस्तकांचाही समावेश होता. हाइनरिश हाइन या महान जर्म-ज्यू कवीने त्याच्या १८२०-२१ या वर्षात लिहिलेल्या अल्मान्सर या नाटकात अचूक भाकित केलेलं... जिथे पुस्तकं जाळली जातात तिथे अखेर माणसंही जाळली जातील... त्याची पुस्तकेही अर्थातच जाळण्यात आली होती.


पुढे ब्रेश्टच्या तीन कविता.

1- 
पेटवलेली पुस्तके


जेव्हा सत्ताधाऱ्यांनी आदेश सोडले
जाळा सारी बेकायदेशीर पुस्तके
मठ्ठ बैलांचे कळप जुडले
भली गाडाभर पुस्तके जाळात फेकण्यासाठी


एक नाणावलेला लेखक जो होता हद्दपार...
संतप्त झाला
तपासताना बेकायदा ठरलेल्या पुस्तकांची यादी
त्याच्या पुस्तकांची नावं- नव्हती त्यात


झपाट्याने गेला आपल्या मेजाकडे
त्याची तुच्छता, संताप उफाळत होता
सत्तेतल्या मद्दडांना तापल्या लेखणीने लिहायचं होतं त्याला
जाळा मलाही! लिहिलं त्याने
मी तर सतत सत्यच मांडत आलो ना?
आणि तुम्ही? तुम्ही मला एका खोटारड्या माणसासारखी वागणूक देता!
जाळा मला!


The Burning of the Books


When the Regime
commanded the unlawful books to be burned,
teams of dull oxen hauled huge cartloads to the bonfires.


Then a banished writer, one of the best,
scanning the list of excommunicated texts,
became enraged: he’d been excluded!


He rushed to his desk, full of contemptuous wrath,
to write fiery letters to the morons in power—
Burn me! he wrote with his blazing pen—
Haven’t I always reported the truth?
Now here you are, treating me like a liar!
Burn me!




2-

निरोप


आपण एकमेकांना मिठी मारली
माझ्या बोटांना स्पर्श झाला गर्भरेशमी कापडाचा
आणि तुझ्या बोटांना झाला स्पर्श
विरलेल्या कापडाचा
पटकन् मिठीतून दूर झालो आपण.
तुला कुठल्याशा धमाल मेजवानीचं निमंत्रण होतं
आणि माझ्या पाठलागावर होती कायद्याची प्यादी
आपण बोललो थोडं- हवापाण्यावर
आणि आपल्या मैत्रीची जादू कशी कायम टिकेल वगैरे...
आणखी कशावरही बोलणं...
कडू विखारी ठरलं असतं...
नको इतकं शोकांत...



Parting


We embrace;
my fingers trace
rich cloth
while yours encounter only moth-
eaten fabric.
A quick hug:
you were invited to the gay soiree
while the minions of the "law" relentlessly pursue me.
We talk about the weather
and our eternal friendship's magic.
Anything else would be too bitter,
too tragic.


3-

दुष्टाव्याचा मुखवटा


माझ्या भिंतीवर शोभते आहे एक जपानी कोरीव चित्र
कुठल्याशा प्राचीन सैतानाचा मुखवटा... सोनेरी मुलाम्याने सजलेला
मी पाहातोय... थोडीशी सहानुभूतीच वाटतेय मला- कशाला नाकारू?
त्याच्या कपाळावरच्या तटतटलेल्या शिरा पाहून...
दुष्टाव्यासाठीही केवढा प्रचंड विद्रूप प्रयत्न करावा लागतो.


The Mask of Evil

A Japanese carving hangs on my wall —
the mask of an ancient demon, limned with golden lacquer.
Not altogether unsympathetically, I observe
the bulging veins of its forehead, noting
the grotesque effort it takes to be evil.




Comments

Popular posts from this blog

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.

पुस्तक- एमिली डिकिन्सन