भय वाटतं तुला... डायना मारी बंबार्दिरी
परिचयाचा भंवताल सोडून देण्याचं भय वाटतं तुला
परिचयाच्या या भंवतालात आहे एक पांघरलेला अज्ञान भाव
तुला सुरक्षित वाटणारा आणि समाधानात गुरफटवणारा
तू नाकारून टाकतोस विवेकाचा स्वर
कारण तुला बंदिस्त करणाऱ्या भंवतालाच्या कुंपणाने
आंधळं केलेलं असतं तुला
स्वतःशी खरं वागून पहा
“सत्याला
झाकून टाकलंस आणि जमिनीत गाडून टाकलंस,
तर ते वाढीला लागेल जोमाने, आणि गोळा करील अशी विस्फोटक
शक्ती
की जेव्हा ते फुटून बाहेर येईल, तेव्हा वाटेत येणाऱ्या
साऱ्या भवतालाच्या उडवील चिंधड्या.”
म्हणालेला एमिल झोला... (१८४०मध्ये जन्मलेला आणि १९०२मध्ये
मेलेला)
मिळवायला हवी तुला शक्ती
स्वतःला सकारात्म सत्याने वेढून घेण्याची.
सशक्त हो.
शक्ती, सत्य आणि विश्वास स्वतःतच मिळवणं
हीच आहे किल्ली बंदिस्त करणारा भंवताल खुला करण्याची
तू असशील मुक्तात्मा
कुणीच नाही ठरवणार तुझ्या अस्तित्वाचे कंगोरे
कुणीच नाही सांगणार तुला- काय विचार करावा, काय कृती...
काय उक्ती...
कुणीच नाही करणार तुझं जगणं नियंत्रित
दुसरं कुणीही नाही... फक्त तू स्वतःच.
डायना-मारी बंबार्दिरी
You are scared to let go of the familiar;
the familiar has a feigned ignorance of making you feel safe and comfortable.
You dismiss the voice of reason,
because you are blinded by the sole thing that barricades you.
Be true to yourself:
“If you shut up truth and bury it under the ground,
it will but grow, and gather to itself such explosive power
that the day it bursts through, it will blow up everything in its way” (Emile Zola; 1840-1902)
You must find strength.
Surround yourself with what is positive.
Be strong.
Strength, truth and belief in yourself are the keys to unlocking
all that binds you.
You are a free spirit;
No person characterizes your being;
No person dictates how you think, act or speak;
No person controls your life;
No person except for yourself.
Diana-Marie Bombardieri
Comments
Post a Comment