Dear- Kavita Mahajan
Dear
A strange street
Midnight
I was walking alone
Not alone
A dream was with
me
०
When you climb down a valley
You feel your height
Is reducing
Wild flowers and
The red velvet arachnid on a blade of grass
Become your equals, almost.
When one comes down so deep
And deeper
One understands, why you live near a small brook in the valley
And not on the mountain-top
०
I was a brook
You were bathing
I was a river
You were swimming
I turned into a sea
And you surfed the waves
Now I have become a desert
And you a fossil
०
०
Some word… that is daring
Like you
Some word candid
like me
Even then love does not reside in words…
For it, the space, free and blank
between two words
Is dear...
--
प्रिय
अनोळखी रस्ता
मध्यरात्र
चालत होते एकटी
एकटी नव्हते
स्वप्न होतं सोबत.
०
दरीत उतरताना
आपली उंची
कमी कमी वाटू लागते
रानफुलं आणि
इंद्रगोप गवताच्या पात्यावरचा
बरोबरीचे बनतात
इतकं
खोल
खोल
उतरत आलं की कळतं
का दरीतल्या ओढ्याजवळ राहतोस तू
शिखरावर न राहता.
०
मी एक झरा होते
तू नहात होतास
नदी होते
पोहत होतास
समुद्र बनले
स्वार झालास लाटांवर
वाळवंट उरले
तू जीवाष्म.
०
धम्मक असते एखाद्या शब्दात
तुझ्यासारखी
प्रांजळ असतो एखादा शब्द
माझ्यासारखा
तरीही प्रेम राहत नाही शब्दांत येऊन
त्याला दोन शब्दांमधली जागाच
प्रिय वाटते
मोकळी.
मध्यरात्र
चालत होते एकटी
एकटी नव्हते
स्वप्न होतं सोबत.
०
दरीत उतरताना
आपली उंची
कमी कमी वाटू लागते
रानफुलं आणि
इंद्रगोप गवताच्या पात्यावरचा
बरोबरीचे बनतात
इतकं
खोल
खोल
उतरत आलं की कळतं
का दरीतल्या ओढ्याजवळ राहतोस तू
शिखरावर न राहता.
०
मी एक झरा होते
तू नहात होतास
नदी होते
पोहत होतास
समुद्र बनले
स्वार झालास लाटांवर
वाळवंट उरले
तू जीवाष्म.
०
धम्मक असते एखाद्या शब्दात
तुझ्यासारखी
प्रांजळ असतो एखादा शब्द
माझ्यासारखा
तरीही प्रेम राहत नाही शब्दांत येऊन
त्याला दोन शब्दांमधली जागाच
प्रिय वाटते
मोकळी.
Comments
Post a Comment