Dismantle each and every brick- Kavita Mahajan

2.

Dismantle each and every brick
Your virtue is tied and chained
My joyful sin roams free
In the meadows, high on breeze

Hey, your story gets over in one and half pages
With a falsified end
That they lived happily ever after
My story begins right there
A real fairy
Who is child no more
She flies into a profoundly deep blue sky
You cannot even see your own invisible song
My notes are like blades
Hidden in the darkness of womb

Hah… Your wall does not have a mirror,
Or you would know…
So let me tell you this
You are my own image
From the past

Dismantle each and every brick
Do not be afeard
I am here this side -of time…

मूळ कविता
  

मोकळी कर एकेक वीट

माझं पाप मोकळं
उंडारतंय माळरानावर वारा पिऊन
तुझी गोष्ट दीड पानात संपते
आणि ते सुखाने नांदू लागले म्हणत
मानभावीपणानं;
माझी गोष्ट
सुरू होते तिथून खर्‍याखुर्‍या परीची
पोरपण संपवून उडते जी
प्रगल्भ निळ्या आकाशात
तुझं गाणं अदृश्य
तुलाही दिसलेलं नाही ते कधी आजवर
माझे सूर गर्भागाराच्या काळोखात
दडवलेल्या तलवारी
तुझ्या भिंतीला आरसाच नाहीये
म्हणून हे सांगावं लागतंय
नाहीतर कळलं असतं तुला
तू माझंच रूप आहेस बयो
भूतकाळातलं

मोकळी कर एकेक वीट
घाबरू नकोस
मी आहे अल्याड.

Comments

Popular posts from this blog

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.

पुस्तक- एमिली डिकिन्सन